आमचे ध्येय
सामाजिक सुधारणांच्या उपक्रमांद्वारे परिणामकारक बदल घडवून आणणे.
संस्थापकांच्या नजरेतून
“वाढणारी सामाजिक दरी ही केवळ एक छोटीशी लढाई नसून ते एक दीर्घकाळ चालणारे युद्ध आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी आणि अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी सगळ्या बाजूंनी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. युद्ध किती मोठं आहे हे माहीत असल्याशिवाय तुम्ही ते जिंकू शकत नाही. त्यामुळे लढण्याआधी पूर्वतयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच सामाजिक समस्यांशी लढताना आम्ही त्याच्या संशोधनावर भर देऊन परिणामकारक बदल घडवून आणू इच्छितो. सोशल रिफॉर्म्सच्या वतीने आम्ही तुम्हाला या प्रक्रियेमध्ये सामील होण्याचे आवाहन करतो!