The Social Reforms

विविध उपक्रम आणि यशोगाथा

विविध उपक्रम आणि यशोगाथा

खेळ

क्रिकेट | तिरंदाजी

ग्रामीण भागातील मुलं जी क्रिकेट, तिरंदाजी यांसारख्या क्रीडा क्षेत्रात जाण्यास इच्छुक असतील त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रे, शिबिरे, कार्यशाळा आणि शालेय स्तरावरील उपक्रम सुरू करून, TSR ने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिरंदाजी क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडू आणि चॅम्पियन्सना प्रशिक्षित केले आहे.

आरोग्य

TWJ – द सोशल रिफॉर्म्सच्या आरोग्य विभागाद्वारे, विभागप्रमुख डॉ. श्रद्धा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत एकूण ८७ आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्यात आले. या आरोग्य विषयक उपक्रमांद्वारे १६,६६७ लोकांना सेवा पुरवण्यात आली. आरोग्य विभागाद्वारे नियमितपणे दुर्गम तसेच ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे, जनजागृती शिबिरे, प्रथमोपचार मार्गदर्शन, आदर्श जीवनशैली मार्गदर्शन, इत्यादींचे आयोजन केले जाते. आरोग्य विभागाद्वारा ३ क्लिनिक चालविले जातात. विभागाने नुकतेच चिपळूण येथे अत्याधुनिक चिकित्सा डायग्नोस्टिक सेंटर तसेच वेलनेस क्लब या सेवाही सुरू केल्या आहेत.

संशोधन

कोणत्याही सामाजिक विषयाच्या मूळाशी जाऊन त्याच्या सखोल अभ्यासाला वाव मिळावा यासाठी TSR ने संशोधन विभाग (द इन्क्युबेशन सेंटर) सुरू केले आहे. या संशोधन केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी संशोधकांना वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी आणि त्या दृष्टीने भवतालच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आतापर्यंत, संशोधन विभागाने दोन बॅच पूर्ण केल्या आहेत आणि त्यातील सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी संशोधक आता शिक्षण आणि कृषी क्षेत्रात चांगले योगदान देत आहेत.

शिक्षण

माझी शाळा | स्वसंरक्षण | कार्यशाळा | तज्ञांचे मार्गदर्शन

ग्रामीण शाळांमध्ये शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी TSR प्रयत्नशील आहे.

माझी शाळा

ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, ‘माझी शाळा’ हा TSR चा प्रमुख उपक्रम आहे. ‘माझी शाळा’ या प्रकल्पा अंतर्गत शालेय वस्तू, पाठ्यपुस्तके आणि ग्रंथालयाच्या पुस्तकांचा पुरवठा तसेच तज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि बैठक व्यवस्था, इत्यादी शालेय सुविधा पुरविल्या जातात. माझी शाळा व्यतिरिक्त, TSR कडून अनेक शाळांमध्ये स्व-संरक्षण कार्यशाळांद्वारे विद्यार्थिनींना सक्षम केले गेले आहे.

परफॉर्मिंग आर्ट्स

नाट्य | कला | चित्रपट महोत्सव | नृत्य

TSR च्या नाट्य विभागाद्वारे  शालेय विद्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. त्यांना भविष्यात नाट्य क्षेत्रात करियर करण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. नाट्य विभागाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्ये नाट्य कार्यशाळा घेण्याचे मोठे काम हाती घेतले. आतापर्यंत चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी येथील शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. नाट्य शाखेचे प्रमुख मंथन खांडके यांच्याकडून ४२ विद्यार्थी कलाकारांना वर्षभर अभिनय कौशल्य विकसित करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

‘कला आरंभ’ म्हणजे TSR चा कलाविभाग असून त्याद्वारे उदयोन्मुख कलाकारांना मार्गदर्शन, आवश्यक सुविधा आणि त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. कला आरंभद्वारा सर्वेश दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ कलाकारांमार्फत  विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी कला कार्यशाळा व स्पर्धा घेण्यात येतात. 

TSR तर्फे रत्नागिरीत येथे ‘द टॉकिंग फ्रेम्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

जस्ट मूव्ह या नृत्य अकादमी मार्फत कोथरूड पुणे येथे प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रफुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. अद्ययावत स्टुडिओ व तज्ञांचे मार्गदर्शन ही या अकादमीचे वैशिष्ट्ये आहेत.

कृषी

मिश्र शेती | सेंद्रिय शेती | करार शेती | हायड्रोपोनिक्स | देवराई

आपल्या बहु-स्तरीय मिश्र शेती उपक्रमाद्वारे, TSR चे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी विविध नमुने प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यातील कुमठे गावात नुकताच बहु-स्तरीय मिश्र शेतीचा पायलट प्रोजेक्ट यशस्वीपणे राबविण्यात आला. पाणी फाउंडेशनचे सीईओ श्री. सत्यजित भटकळ यांनी या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

कृषी विभागाद्वारे करार शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांकरीता  मार्गदर्शन वर्गांचेही आयोजन  केले जाते. 

हायड्रोपोनिक्स पद्धतीने भाजीपाला पिकवण्याचा आणखी एक प्रकल्प सध्या चिपळूणमध्ये सुरू आहे.

देवराई 

श्री. हेमंत तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या देवराई प्रकल्पांतर्गत TSR ने यावर्षी पहिल्या टप्प्यात जवळपास ५०,००० जंगली रोपे तयार करून, वाढवून त्यांचे मोफत वितरण केले आहे. या प्रकल्पाचा उद्देश विरळ होत असलेल्या वनराईचे जतन आणि संवर्धन करणे आहे.

साहित्य

भावार्थ | उपक्रम

दर्जेदार मराठी साहित्य आणि तेही सवलतीत उपलब्ध करून देणारा, ग्रंथ प्रदर्शने, स्पर्धा, कार्यशाळा अशा विविध उपक्रमांद्वारे मराठी साहित्य घरोघरी पोहोचविण्याचा उपक्रम म्हणजे भावार्थ. सुमधूर संगीतासह कॉफीचा आनंद घेत पुस्तकांमध्ये हरवून जाण्याचे ठिकाण म्हणजेच भावार्थ. सध्या पुणे आणि चिपळूणमध्ये भावार्थची दालने कार्यरत आहेत. भावार्थद्वारे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या कार्यक्रमांचे आणि मुलाखतीचेही आयोजन केले जाते. हा कार्यक्रम ‘भावार्थ मैफल’ म्हणून ओळखला जातो. चिपळूणमध्ये अशा पाच मैफली संपन्न झाल्या असून त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. पुणे भावार्थमध्ये अनेक दिग्गजांना ‘शब्दयात्री’मध्ये भेटण्याची संधी मिळते.

जनसंपर्क

पाणी व्यवस्थापन | सामजिक बांधिलकी  | नदी स्वच्छता मोहीम  

प्रथमेश पोमेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली TSR च्या जनसंपर्क शाखेद्वारे विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हाती घेतले जातात. TSR सामाजिक भान असणाऱ्या संस्था आणि व्यक्तींसोबत पाणी व्यवस्थापन, सामुदायिक जलसंधारण, कृषी, आर्थिक सहाय्य आणि गतीमंद मुलांना मदत इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम करते. पाणी व्यवस्थापन शाखेअंतर्गत TSR ने समविचारी संस्थांसह चिपळूणमधील पूर कमी करण्यासाठी नद्यांचे गाळ काढणे आणि त्यांची स्वच्छता करणे, गुहागरमध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी स्वयंसेवकांसह श्रमदान करणे, इ. अनेक उपक्रम राबवले आहेत.

आजपर्यंत TSR च्या २४० उपक्रमांद्वारे ४८,००० लोकांना मिळाला लाभ