The Social Reforms

उपक्रम

द सोशल रिफॉर्म्स समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. समाजातील सर्व पातळींवर चांगले बदल घडवून आणण्यासाठी TSR ने सुधारणेची गरज असलेल्या काही क्षेत्रांची निवड केली आहे. आतापर्यंत साधारण २४० उपक्रमांद्वारे TSR हजारो लोकांपर्यंत पोहचले आहे.

आरोग्यसेवा

दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी ही आजच्या काळाची गरज आहे. ‘द सोशल रिफॉर्म्स’ मधील आरोग्य विभाग हा तळागाळातील लोकांसाठी ‘सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्य’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करीत आहे.

bha

भावार्थ

भावार्थ ही ‘द सोशल रिफॉर्म्स’ची साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील शाखा आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि समृद्ध मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी भावार्थ सुरू करण्यात आले. आपल्या स्थापनेपासूनच भावार्थद्वारे  सातत्याने ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

कृषी

शेतीला चालना देण्यासाठी आणि नवीन कृषी पद्धतींचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी द सोशल रिफॉर्म्सने आपला कृषी विभाग सुरू केला आहे. ‘द सोशल रिफॉर्म्स’ कृषी क्षेत्रात नवनवीन बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून TSR देवराईंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे.

इतर उपक्रम

द सोशल रिफॉर्म्सच्या माध्यमातून सामाजिक बांधणीचे विविध उपक्रम हाती घेतले जातात. शिक्षणापासून संशोधनापर्यंत, खेळापासून पर्यावरणापर्यंत,‘द सोशल रिफॉर्म्स’ प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कला, क्रीडा, पाणी व्यवस्थापन, जनसंपर्क, कृषी, आर्थिक सहाय्य आणि गतीमंद मुलांना मदत हे त्यापैकीच काही आहेत.

आजपर्यंत TSR च्या २४० उपक्रमांद्वारे ४८,००० लोकांना मिळाला लाभ