TWJ फाउंडेशनच्या अंतर्गत समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली करत असलेल्या सामाजिक कार्याला ३ जानेवारी २०२१ रोजी एक ठोस स्वरूप मिळाले आणि द सोशल रिफॉर्म्स (TSR) ह्या संस्थेची सुरवात झाली. संस्थेची पहिली शाखा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये स्थापन झाली. द सोशल रिफॉर्म्स समान विचारसरणी असलेल्या संस्था तसेच सामाजिक कार्यात रस असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी, शासकीय व निम शासकीय संस्था यांच्या सोबतीने एका चांगल्या बदलाकडे वाटचाल करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच द सोशल रिफॉर्म्स २४० हून अधिक उपक्रमांद्वारे ४८,००० हून अधिक लोकांपर्यंत पोहचले आहे. या उपक्रमांमध्ये आरोग्य, कृषी, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, नाट्य, कला आरंभ, जनसंपर्क यांसारख्या विविध विभागांचा समावेश होतो.
येणाऱ्या काही वर्षांमध्ये सोशल रिफॉर्म्स संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक लोकांच्या अथक प्रयत्नांमुळे रिफॉर्म्सचे काम आकार घेत आहे.
संस्थेच्या प्रमुख फळीत लाभलेले प्रसन्न करंदीकर, महान कोरगावकर, डॉ. श्रद्धा जाधव, रविदास कांबळे, कमलेश कळसुलकर, ओंकार घाडगे आणि सौरभ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम सुरळीतपणे सुरू आहे.